नमस्कार, आमची ओळख असा शब्द जरी इथे वापरला असला तरी आमची अशी कोणतीही टीम नाही. मी सचिन सखाराम पिळणकर हे सर्व काम करतो. आत्ता पर्यंत मी अनेक वेबसाइट बनविलेल्या आहेत. त्यातील माझ्याच दोन वेबसाइट म्हणजेच अवकाशवेध.कॉम आणि सहजच.कॉम मराठीतील अवकाशाची आणि कॉम्प्युटरची सोप्प्या भाषेमध्ये माहिती देणार्या वेबसाइट आहेत. त्यातील अवकाशवेध.कॉम या वेबसाइटला तर महाराष्ट्र शासनाचे सर्वोत्कृष्ठ संकेतस्थाळाचे प्रथम बक्षिस देखिल मिळाले आहे.
एखादी वेबसाइटबनविल्या नंतर त्या वेबसाइटचे सर्व हक्क त्या वेबसाइटच्या मालकांना सपूर्त करण्यात येतात तसेच त्यांना हवे असल्यास वेबसाइटवर नविन माहिती कशी अपलोड करायची याचे देखिल मोफत प्रशिक्षण देण्यात येते, यामूळे ज्यांची वेबसाइट असते त्यांना त्यांच्या वेबसाइटवर ताबडतोब माहिती अपलोड करुन वेबसाइट अद्ययावत ठेवता येते. याचा दुसरा फायदा असा होतो की ज्याची वेबसाइट त्यानेच अपडेट केल्याने मला इतर नविन-नविन वेबसाइटची कामे घेता येतात.
वेबसाइट बनविताना ती सुटसुटीत असावी जेणे करुन ती वेबसाइट पाहणार्याला ती व्यवस्थित हाताळता आली पाहीजे तसेच ती त्यावरील रंगसंगती ही त्या वेबसाइटच्या विषयाला अनुसरुन असावी असा विचार केला जातो. |